सध्या कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे संपूर्ण जग धास्तावलं आहे. या विषाणूवर सध्या तरी कोणताही उपचार नाही. त्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यायला हवा. आपण आपल्यासह कुटुंबाला आणि समाजालाही सुरक्षित ठेवायला हवं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. यासाठी काही पदार्थांचं सेवन करता येईल. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या काही घटकांविषयी…
- आहारात आलं आणि लसणाचा
समावेश करा. या दोन्ही घटकांमध्ये विषाणूंचा नाश करण्याची क्षमता आहे. तुम्ही आलं घातलेला चहा पिऊ शकता. तसंच विविध पदार्थांमध्ये आलं-लसणाची पेस्ट घालू शकता. आल्याचे तुकडेही चघळता येतील. - चक्रफूल या मसाल्याच्या पदार्थात शिकिमिक आम्ल असतं. फ्लूविरोधी टॅमी फ्लू गोळ्यांच्या निर्मितीत या आम्लाचा वापर होतो. चक्रफूलाची पूड करून विविध पदार्थांमध्ये घालता येईल. पुलाव, भाज्यांमध्येही चक्रफूल घालता येईल.
- ओरिगॅनो, तुळस, हळद या घटकांमध्येही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण आहेत. सर्दी, खोकला, तापावर उपाय म्हणून तुळशीची पानं चघळता येतील. हळदीचं दूधही पिता येईल.
- खोबरेल तेलामुळेही रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या तेलात लॉरिक आणि कॅप्रिलिक आम्लं असतात.
- शेंगदाणे, पिस्ते, द्राक्ष, ब्लूबेरी, क्रनबेरी, स्ट्रॉबेरी, कोका, डार्क चॉकलेट यामध्ये रेव्हरेट्रोल नामक घटक असतो. या घटकामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जंतूसंसर्ग, अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्ग, ताण, जखमा बर्या करण्यात हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.
- अँटी ऑक्सिडंटयुक्त ‘क’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात खूप प्रभावी आहे. ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराच्या पेशींचं कार्य सुधारतं. ‘क’ जीवनसत्त्वाच्या
कमतरतेमुळे जंतूसंसर्गाचा धोका वाढतो. आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, लाल सिमला मिरची यांचा आहारात समावेश करा. - भाज्या शिजवून खा. फळं आणि भाज्या स्वच्छ धुवा. उपवास करू नका. फक्त फळांच्या रसावर राहू नका. भाज्या शिजवण्याआधी अर्धा तास मीठ आणि हळद घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवा.