वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत सहभागी होत असलेल्या मुंबई सिटी एफसी संघातील बचावफळीत खेळणाऱया प्रतिक चौधरीने निरोप घेतला आहे. सदर माहिती मुंबई सिटी एफसी संघाच्या अधिकाऱयाने दिली.
प्रतिक चौधरी बरोबर मुंबई सिटी एफसी संघाने एक वर्षांसाठी करार केला होता. प्रतिक चौधरीकडून एक वर्षांच्या फुटबॉल हंगामात केवळ एकमेव गोल नोंदविला गेला होता. मुंबई सिटी एफसी संघातर्फे प्रतिक चौधरीला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.