आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन, सांखळीत कार्यकर्ता शिबिर
सांखळी/प्रतिनिधी
कार्यकर्ता ही पक्षाची खरी ताकद असून आज पर्यंत शिस्तबद्ध तंत्रणेच्या जोरावरच भाजपने राज्यात शून्यातून सत्तेपर्यंत मुसंडी मारलेली आहे. आज केंद्र व राज्यात भाजप सरकार असून प्रत्येक घरात समृद्धी व कल्याणकारी योजना पोचवून प्रत्येक कुटुंब भाजपमय करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन कार्यकर्त्यानी कामाला लागावे असे आवाहन केंद्रीय आयुश मंत्री श्रीपाद नाईक यांनी साखळी येथे केले
साखळी मतदारसंघातिल भाजप कार्यकर्त्या साठी सांखळी नगरपालिका कार्यालय सभागृहात दोन दिवसीय कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते? आज रविवारी प्रशिक्षणवर्गाचा समारोप झाला.
शिबिर समारोप कार्यक्रमास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना निवसणुकीची तयारी बूथ यंत्रणा केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या बाबत जागृती करून आगामी जिल्हा पंचायत व विधानसभा निवडनिकीत प्रचारवची रण नीती काशी असावी या बाबत मार्गदर्शन केले
मुख्यमंत्री प्रमोद सावंत,
भाजप ने केंद्र व राज्यात प्रगतीचा चढता आलेख राखलेला असून अनेक कल्याणकारी धाडसी निर्णय घेतले आहेत प्रत्येक घर समृद्धी यावी ही आमची संकल्पना असून त्याससाठी कार्यकर्ता ही शक्ती आहे प्रत्येक बुथ वर सक्षम कार्यकर्त्यांची टीम सजक करून आगामी काळात सर्व निवडणुकीत मोठे यश संपादन करण्यासाठी कार्यरत राहा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले
खोटय़ा प्रचारकडे दुर्लक्ष करा
या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेच त्याच बरोबर जे विरोधक खोटा प्रचार करून समाज माध्यमावर चुकीची माहिती देतात त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यानी समाजात सरकारच्या अनेक कामांची माहिती घरोघरी पोचवावी असे आवाहन केले. सरकार म्हाद इ ,खाण प्रश्न तसेच कोळसा हाताळणी या प्रश्नी सर्व ती कार्यवाही करीत आहे. अनेक योजनांचा पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे आज जनता भाजपच्या पाठीशी भक्कम असून ती अधिक मजबूत करण्याचे कसब कार्यकर्त्यानी साधावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी केले.
या वेळीमंड ळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सुभाष मळीक, स्वाती मायनिकर याची उपस्थिती होती. शिबिरात यात भाजपच्या जे÷ नेते ,विश्वास सातरकर, सदानंद तनावंडे संदीप फलारी ,सुलक्षणा सावंत यांनी विविध विषयांवर कार्यकर्ते ना ? मार्गदर्शन केले
या वेळी सांखळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, आमोणत्,हरवळे, न्हवेली गावातील प्रमुख कार्यकर्तेनी प्रशिक्षण घेतले.