प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटक, महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये एकूण 143 खेलो इंडिया केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय केंदीय कीडा खात्याने घेतला असून त्याकरिता 14.30 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज्यातील सर्व 31 जिल्हय़ांमध्ये खेलो इंडिया केंद्रे स्थापण्यास केंदीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी मंजुरी दिली आहे.
एक जिल्हा, एक खेळ या संकल्पनेनुसार कीडा व क्रीडापटूंना प्रोत्साहन देणे तसेच क्रीडापटूंची निवड आणि त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणे हा यामागचा उद्देश आहे.
काही महिन्यांपूर्वी बेंगळूर दौऱयावर आलेल्या किरण रिजीजू यांना राज्याचे क्रीडा आणि युवजन सबलीकरण खात्याचे मंत्री डॉ. नारायणगौडा यांनी क्रीडापटूंना अनुकूल व्हावे यासाठी राज्यातील 31 जिल्हय़ांमध्ये खेलो इंडिया केंद्रे स्थापन करण्याची विनंती केली होती.