पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा आदेश, लवकरच कोरोना रुग्णांशी संवाद साधणार
प्रतिनिधी / बेळगाव
प्रत्येक तालुक्मयातील कोविड-19 सेंटरना भेट देऊन तेथील सर्व परिस्थितीचे अवलोकन करून जिल्हाधिकाऱयांना अहवाल द्यावा, त्यानंतर चर्चा करून पुढील रुपरेषा ठरविणे सोपे होईल, असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
कोविड-19 आणि अतिवृष्टी या संदर्भात सर्किट हाऊस येथे त्यांनी शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रत्येक तीन ते चार वर्षांनी नवीन नवीन रोग येत आहेत. मात्र कोविड-19 ची धास्ती अधिक आहे. लोकांनी त्याचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सक्षम रहावे मात्र घाबरुन जाण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
रुग्णांशीही संवाद साधणार
शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ग्रामीण भागात ते कमी होत आहेत. पोलिसांना जर लक्षणे आढळली तर त्यांनी घरातच उपचार घेणे उत्तम आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा घरी उपचार घेणे सोयस्कर ठरते. घरी उपचार घेतल्याने कुटुंबासमवेत संपर्क राहतो आणि उत्तम आहार मिळतो, असे ते म्हणाले. हॉस्पिटलमध्ये असणाऱया रुग्णांना उत्तम आहार द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. पंधरा दिवसांनंतर हॉस्पिटलला भेट देऊन आपण रुग्णांशीही संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी, 700 बेड असून ऑक्सिजन व्यवस्था सुद्धा आहे. जिल्हय़ाला 54 व्हेंटिलेटर आले असून त्यातील दहा व्हेंटिलेटर सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आले आहेत. अन्य व्हेंटिलेटर तालुक्मयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती दिली. या बैठकीला जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी तालुका आणि जिल्हय़ातील कोविडबाबत माहिती दिली. कोविड काळात सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित 140 महिलांची प्रसूती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पीक सर्वेक्षण करण्याची सूचना
दरम्यान यंदा अतिवृष्टीमुळे गंभीर समस्या उद्भवली नाही. शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्यासाठी पीक सर्वेक्षण करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. अतिवृष्टी झालेल्या भागांना केंद्र सरकारच्या पथकाने भेट दिली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. एच. जगदीश आदी उपस्थित होते.