गथम अभिनेते भार्गव पोलुदासू यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
गथम ही मानसिक थ्रिलर चित्रपट आहे. प्रत्येक माणसामध्ये एक मनोरूग्ण असतो. परंतु काही घटनांद्वारे तो मनोरूग्ण बाहेर येतो. त्या कुठल्या घटना आहेत याबद्दल सांगणारा चित्रपट म्हणजे गथम. या चित्रपटाची निवड आंचिममध्ये झाली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा चित्रपट ऍमेझोन प्राईमवरही उपलब्ध आहे अशी माहिती गथम चित्रपटाचे अभिनेते भार्गव पोलुदासू यांनी 51 व्या आंचिममध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हा चित्रपट तयार करण्यापूर्वी आपल्या वैयक्तिक जागा कशी बनवता येईल याबद्दल विचार करत होतो. खरे तर मी जास्त गोष्टी शेअर करत नाही. माझ्या बाजूला मर्यादा तयार केल्या आहेत. सदर लघुपट करण्यासाठी माझ्या एका मित्राने तयार केलेल्या वैभव या लघुपटामुळे प्रोत्साहन मिळाले. 2019सालाच्या शेवटी ओरू पाथिरा स्वप्नम पोले हा लघुपट तयार केला. हा लघुपट तयार केला आणि कोरोना काळ सुरू झाला त्यामुळे या लघुपटाची निवड होईल की नाही यात शंका होती अशी माहिती शरण वेणुगोपाल यांनी यावेळी दिली. या चित्रपटातून नियोजन कसे करावे हे शिकलो. मी सुट्टीच्या दिवशी शूट करत होतो. 10 ते 12 लोक शूटिंग साईटवर होते. परंतु 20 तास काम करत होतो. जर कुणी चित्रपट बनवितो त्या चित्रपटाचा आदर करा. चित्रपट तयार करणे खरच अवघड आहे. प्रादेशिक चित्रपटांसाठी ओटीटी व्यासपीठ उत्तम पर्याय आहे असे अभिनेता भार्गव यांनी यावेळी सांगितले.