वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील विदेशी भांडवलामध्येही 28 जानेवारी पर्यंत 5.42 अब्ज डॉलर्सच्या वाढीसोबत 481.54 अब्ज डॉलरचा नवीन विक्रम नोंदला आहे. सदरचा हा 23 वा आठवडा राहिला आहे,की ज्यामध्ये विदेशी भांडवलाच्या उलाढालीत वाढ नोंदवली आहे. सध्या 480 अब्ज डॉलरची नोंद ही प्रथमच करण्यात आली आहे. या अगोदर असा विक्रम 21 फेब्रुवारी रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात विदेशी भांडवलाचे भंडार 2.90 कोटी डॉलरने वाढून 476.12 अब्ज डॉलरवर पोहोचले होते.
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्याकडून आठवडय़ातील आकडेवारी सादर केली होती. त्या आकडेवारीनुसार 28 फेब्रुवारी रोजी समाप्त झालेल्या विदेशी भांडवली बाजारात 4.37 अब्ज डॉलर इतक्या मोठय़ा प्रमाणात विदेशी चलनात वाढ झाल्याची नोंद केली आहे. या उसळीनंतर विदेशी चलनातील संपत्ती 445.82 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आठवडय़ाच्या दरम्यान आरबीआयने सोने खरेदी चालू ठेवली, त्यामध्ये सोन्याचा बाजार 1.02 अब्ज डॉलरने वाढून 3.68 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी(आयएमएफ)ने आरक्षित निधी 3.1 कोटी डॉलरने वाढून 3.61 अब्ज डॉलरवर आणि विशेष अधिकार निधी 50 लाख डॉलरने वाढून 1.43 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.