खानापूर / प्रतिनिधी
खानापुरात दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक समाप्त होण्यास दुसरे दिवशीची पहाट उगवते. पण यावर्षी मात्र शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रात्री दहाच्या आतच पूर्ण झाल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीची नव्या इतिहासात नोंद झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे सर्वच मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत अत्यंत साधेपणा होता. शिवाय डॉल्बी, बेन्जो यासारख्या वाद्यांना पूर्णपणे फाटा देऊन अत्यंत शिस्तबद्धरित्या विसर्जन मिरवणूक पार पडली.
यावर्षी कोरोना व्हायरसमुळे गणेशोत्सवासंदर्भात राज्य शासनाने काही अटी घातल्या होत्या. यावर्षी शहरातील सर्वच मंडळांनी त्या अटी व नियमांचे तंतोतंत पालन करून मंडप, विद्युतरोषणाई अत्यंत मर्यादित स्वरुपात केली होती. विसर्जन मिरवणुकीसाठी देखील काही नियम लावण्यात आले होते. त्याचे देखील सर्वच मंडळांनी पालन केले. विसर्जन मिरवणुका वेळेत पूर्ण व्हाव्या यासाठी काही मंडळांनी तर आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारी रात्री श्ा़खाrफळ सवाल पूर्ण केले. मंगळवारी दुपारी 3 वाजता चौराशीदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. व अवघ्या दीड तासात म्हणजे सायंकाळी 4.30 वाजता नवीन पूलवजा बंधाऱयावर विसर्जन केले.
सर्वच मंडळांच्या विसर्जन मिरवणुका एकापाठोपाठ
बाजारपेठ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. या मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जनही सायंकाळी 6.30 वाजता केले. उर्वरित मिरवणुकीची सुरुवात सायंकाळी 7 नंतर सुरू झाली. त्यामध्ये रात्री 8.30 वाजता केंचापूर गल्लीतील गणेश युवक मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले. त्यापाठोपाठ खानापूरचा राजा म्हणून ओळखल्या गेलेल्या देसाई गल्लीतील बाल मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्रीमूर्तीचे विसर्जन झाले. त्यानंतर सर्वच मंडळांच्या विसर्जन मिरवणुका एकापाठोपाठ होत्या. स्टेशन रोड विद्यानगर येथील सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी मंदिराजवळील गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. निंगापूर गल्लीतील चव्हाटा गणेशोत्सव मंडळ, बुरुड गल्लीतील गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरमधील गणेशमूर्तीचे विसर्जन केले. सर्वात शेवट म्हणजे रात्री 9.30 रुमेवाडी क्रॉस येथील गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. सर्वच मंडळानी गाडय़ावर विद्युतरोषणाई केली होती. तसेच विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये सहभागी झाली होती.
मिरवणूक मार्गावर एकच गर्दी
दरवर्षी मिरवणुकीला होणाऱया विलंबामुळे रस्त्यावर मिरवणूक बघणाऱयांची संख्या मोजकीच असते. पण यावर्षी मात्र वेळेत मिरवणुका सुरू झाल्याने मिरवणूक मार्गावर एकच गर्दी झाली होती. नवीन पुलवजा बंधाऱयावरदेखील विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. निवडणूक शांततेने पार पाडावी यासाठी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. नवीन पूलवजा बंधाऱयावर नगरपंचायतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था तसेच विद्युतरोषणाई केली होती. विसर्जनाची व्यवस्था पाहण्यासाठी आरोग्य अधिकारी एस. आर. पाटील, प्रेमानंद नाईक व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
घरगुती गणपतींचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत
खानापूर शहरातील घरोघरी असलेल्या गणरायांचेही विसर्जन रात्री उशिरापर्यंत मलप्रभा नदीघाटावर सुरू होते. गल्लोगल्लीत नागरिकांनी एकत्रितपणे येऊन गणेश विसर्जन मिरवणूक काढल्या. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. नैर्माल्य टाकण्यासाठी नदी घाटावर कुंडही ठेवण्यात आले होते..