बाजारात तेजी कायम : सेन्सेक्स 568.90 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात भारतीय भांडवली बाजार हा नव्या उंचीवर झेपावला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने सलग आठव्या सत्रातही बाजाराने आपली मजबूत स्थिती कायम राखली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स दिवसअखेर 569 अंकांनी वधारुन नव्या टप्प्यावर झेपावत बंद झाला आहे.
जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक कल असून सोबत विविध कंपन्यांचे तिमाही आर्थिक सकारात्मक आकडे जाहीर होत असल्याच्या कारणास्तव बाजार बहरात आहे. बाजारात एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक तसेच आयटीसीचे समभाग वधारल्याचे पहावयास मिळाले आहे. मुख्य 30 कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 568.90 अंकांनी वधारत 0.94 टक्क्यांची भक्कम स्थितीत निर्देशांक नवा टप्पा प्राप्त करत 61,305.95 वर पोहोचत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 176.80 अंकांसह 0.97 टक्क्यांनी वाढून नवा विक्रम नेंदवत 18,338.55 वर बंद झाला आहे.
मजबूत तेजीसोबत आयटीसी कंपनीचे समभाग जवळपास 3 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच एचडीएफसी बँक, पॉवरग्रिड कॉर्प, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसरीकडे टीसीएस, एचसीएल टेक, बजाज फायनान्स आणि एशियन पेन्ट्सचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारातील सकारात्मक कल राहिल्याचा लाभ भारतीय बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले आहे. मुख्य म्हणजे खाद्य वस्तूंच्या किमती घसरल्याने किरकोळ महागाई दर कमी होत आहे. उत्साहाच्या वातावरणामुळे भारतीय बाजारातील वातावरणही सकारात्मक राहिल्याचा लाभ गुंतवणूकदारांना घेण्यात यश आले असून आगामी काळातही हीच स्थिती राहणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- आयटीसी……. 256
- एचडीएफसी बँक 1685
- पॉवरग्रिड कॉर्प 204
- आयसीआयसीआय 727
- इंडसइंड बँक. 1209
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1789
- एनटीपीसी….. 149
- टेक महिंद्रा… 1430
- स्टेट बँक……… 490
- बजाज फिनसर्व्ह 18520
- एचडीएफसी. 2808
- टाटा स्टील… 1373
- टायटन…….. 2563
- ऍक्सिस बँक…. 802
- अल्ट्राटेक सिमेंट 7403
- डॉ.रेड्डीज लॅब 4959
- कोटक महिंद्रा 2016
- इन्फोसिस…. 1715
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2699
- मारुती सुझुकी 7490
- हिंदुस्थान युनि 2648
- अदानी पोर्ट…. 811
- विप्रो…………. 707
- ग्रासिम…….. 1754
- हॅवेल्स इंडिया 1473
- वेदान्ता………. 331
- एसीसी…….. 2311
- हिंडाल्को…….. 516
- अंबुजा सिमेंट.. 408
- सिमेन्स…….. 2265
- ब्रिटानिया…. 3904
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टीसीएस…… 3611
- एचसीएल टेक 1250
- बजाज फायनान्स 7860
- एशियन पेन्ट्स 3297
- भारती एअरटेल 686
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 931
- बजाज ऑटो.. 3963
- सन फार्मा…… 841
- कोल इंडिया…. 183
- मदरसन सुमी 246