प्रतिनिधी/ बेळगाव
केएलईएस इंटरनॅशनल शाळेचा इयत्ता 8 वीतील विद्यार्थी प्रथम पै याची अखिल भारतीय स्तरावर झालेल्या ऍसेट टॅलेंट सर्च असेसमेंटमध्ये पहिल्या 50 जणांमध्ये निवड झाली असून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
या परीक्षेत विज्ञान विषयात त्याने 97 टक्के गुण मिळविले असून असेटच्या डिजिटल शिक्षण कार्यक्रमाच्या नोंदणीमध्ये त्याला 25 टक्के सूट देण्यात आली आहे. प्रथमच्या यशाबद्दल प्राचार्या दीप्ती इंगळे, शिक्षक आणि व्यवस्थापन मंडळाने त्याचे अभिनंदन केले आहे.