बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे एका मागोमाग एक चित्रपट येणार आहेत. सूर्यवंशीपासून बच्चन पांडेयर्पंत अक्षयचे अनेक चित्रपट रांगेत प्रदर्शनासाठी तयार आहेत. अक्षय लवकरच आगामी चित्रपट ‘रामसेतू’च्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे. अशा स्थितीत तो उत्तरप्रदेशच्या अयोध्येत पोहोचणार आहे. चित्रिकरण करण्यापूर्वी ‘रामलल्ला’चे दर्शन घेण्याची त्याची इच्छा आहे. याचमुळे अक्षय लवकरच अयोध्येकरता रवाना होणार आहे.
भगवान रामजन्मभूमीमधून चित्रपटाचा मुहूर्त शॉट घेतला जाणार आहे. अक्षय सध्या मालदीवमध्ये कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. मालदीवमधून परतल्यावर अक्षय अयोध्येसाठी रवान होणार आहे, त्यानंतरच चित्रिकरणास प्रारंभ होणार आहे.