सर्वम बाळेकुंद्रीला 51 हजार रूपयांची मदत
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
स्वराज्य क्रिकेट क्लब वैद्यकीय एमआर आयोजित क्रिकेट प्रदर्शनीय क्रिकेट स्पर्धेत जीतीन संघाने अफाक संघाचा 10 धावाने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या प्रदर्शनीय स्पर्धेत जमा झालेले पैसे सर्वम बाळेकुंद्रीला 51 हजार रूपये देण्यात आले.
सर्वम बाळेकुंद्रीच्या मदतीसाठी स्वराज्य क्रिकेट क्लब एमआर या संघटनेने ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये 300 खेळाडूंनी भाग घेतला होता. मराठी विद्यानिकेतन मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जीतीन इलेव्हन संघाने 11 षटकात सर्व बाद 104 धावा केल्या. त्याला उत्तर देताना अफाक इलेव्हनने 11 षटकात 9 बाद 94 धावाच केल्याने हा सामना जीतीन संघाने 10 धावाने जिंकला. या स्पर्धेतून जमा झालेल्या पैशातून सर्वम बाळेकुद्री या चिमुकल्याला विनायक पाटील, अजय असुकर, भरत कांबळे, विजय हिरेमठ, अनिल हुन्सिकट्टी, रमेश हंजी, यल्लाप्पा नाईक, अमित पाटील, सुनिल बजंत्री आदी मान्यवरांच्या हस्ते पैसे देण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वराज्य क्रिकेट क्लबच्या सर्व पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.