प्रतिनिधी /पेडणे
भगवती हायस्कूल पेडणेचे निवृत्त शिक्षक, सहायक मुख्याध्यापक धुळेर म्हापसा येथील रहिवासी प्रदीप मोहनराव सावंत यांची राष्ट्रीय सेवा कार्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
भगवती हायस्कूल पेडणे येथे दीर्घ काळ विद्यादानाचे त्यांनी कार्य केले आहे. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक असून प्रयोगशील शिक्षक म्हणून सदोदित कार्यरत राहिले. त्यानी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे .समाज व राष्ट्र यांच्या प्रती समर्पित राहून निरपेक्षपणे आपले कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्यातर्फे त्यांची राष्ट्रीय सेवा व कार्य गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. दिः13 मार्च रोजी दुपारी 12 वाजता नाशिकच्या कालिदास कला मंदिर नाटय़गृहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया गुणवंतांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यातील पुरस्कार प्राप्त गौरव मूर्ती उपस्थित राहणार आहेत. लोकप्रिय अभिनेते हार्दिक जोशी, संपादक विनोद कुलकर्णी आदी पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.