सहायक आयुक्त भादुले यांचे आवाहन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत जिल्हय़ात सन 2020 ते 2025 या कालावधीत विविध योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत 40 ते 60 टक्के अनुदान असणार आहे. सन 2020-2021 या वर्षात सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मालवणचे सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) ना. वि. भादुले यांनी केले आहे.
देशातील मत्स्य उत्पादनात भरीव वाढ व्हावी व देशातील मच्छीमारांच्या हितसंवर्धनासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना घोषित केली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत जिल्हय़ात विविध योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हय़ात सन 2020 ते 2025 या वर्षामध्ये मच्छीमारांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, महिला यांना 60 टक्के अनुदान व सर्वसाधारण यांना 40 टक्के अनुदान असणार आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मालवण कार्यालयातील सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय ना. वि. भादुले (मो. 9423542954), सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, (मो. 8411843537) व सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी वि. जी. देवकर (मो. 8308336146) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त भादुले यांनी केले आहे.