तीन वर्षांत १२६४४ लाभार्थ्यांना सव्वा पाच कोटी अनुदानाचे वाटप
प्रतिनिधी / सांगली
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सांगली महापालिका राज्यात अव्वल ठरली आहे. मागील तीन वर्षांत महापालिका क्षेत्रातील १२६४४ लाभार्थ्यांना सव्वा पाच कोटी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा मातांसाठी ही केंद्र सरकारची प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे. यामध्ये सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ दिला जातो.
सांगली महापालिका क्षेत्रात १ जानेवारी २०१८ रोजी या योजनेच्या अमलबजावणीला सुरवात झाली.३१ जानेवारी २१२१ अखेर या योजनेसाठी एकूण उद्दिष्ट ११९३७ इतके होते प्रत्यक्षात मात्र उद्धिष्ट ओलांडून १२६४४ इतक्या लाभार्थी मातांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ५ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर महापालिकेकडून जमा करण्यात आले आहेत.