अध्यक्षस्थानी नीला आपटे तर उद्घाटक म्हणून मारुती सांबरेकर उपस्थित राहणार : पहिल्या सत्रात कथाकथन तर दुसऱया सत्रात कवी संमेलन
प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्यावतीने 21 वे बाल साहित्य संमेलन शनिवार दि. 26 रोजी गोगटे रंगमंदिर येथे आयोजित केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नीला आपटे तर उद्घाटक म्हणून मारुती सांबरेकर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात उद्घटनानंतर कथाकथन त्यानंतर दुसऱया सत्रात कवी संमेलन व बक्षीस वितरण होईल. तिसऱया सत्रात अध्यक्षीय भाषण होईल.
पाहुण्यांचा परिचय पुढीलप्रमाणे…
नीला आपटे
नीला आपटे या बेळगावच्याच असून त्यांनी पदवीनंतर मास्टर ऑफ सोशल वर्कमध्ये पदवी घेतली आहे. या परीक्षेत कर्नाटक विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय भाषा याबद्दल विशेष साहित्य संशोधन गेली सहा वर्षे करीत आहेत. जिल्हा रायगड व ता. पनवेल खेडय़ांच्या विकास प्रकल्पावर काम केले. तेथे स्त्री हक्क व मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच अंगणवाडी शिक्षक प्रशिक्षणासाठी अथक प्रयत्न केले. गेली 25 वर्षे त्या निरनिराळय़ा शैक्षणिक प्रकल्पात काम करीत आहेत. 4 ते 6 वर्षांच्या मुलांच्या मानसिक व शारीरिक वाढीसाठी रत्नागिरीच्या साठ अंगणवाडय़ामध्ये गेली दोन वर्षे त्यांचे काम सुरू आहे.
मारुती सांबरेकर
मारुती सांबरेकर हे समाजकार्याची आवड असणारे आणि समाजाच्या उत्कर्षासाठी सतत कृतिशील धडपडणारी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे लहानपण अतिशय प्रतिकुल काळात गेले. त्यामुळे त्यांना शिक्षण फारसे घेता आले नाही. ही सल मनात राहिली म्हणून गरजू, गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक साहाय्य करतात. वयाच्या आठव्या वर्षांपासून
सोनारकाम करीत एक चांगल्या सराफी दुकानाची निर्मिती केली. आज आपला व्यवसाय ते मुलांकडे सुपूर्द करून समाजकार्यात काम करतात. समाजातील प्रति÷ित लोकांच्या सहकार्याने दरवषी वधू-वर मेळावेही भरवितात.