प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील आठही नगरपालिकांचे मुदती संपलेल्या असून त्यांचा प्रारूप आराखडयास मान्यता कधी मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्यापुढे प्रारुप आराखडयाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आज सायंकाळी त्या प्रस्तावावर जिल्हाधिकायांनी सही केल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान अ वर्गातल्या पालिका साठी निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याचे समजते. त्यामुळे आता पालिका निवडणुकांचे पडघम आणखी वाजू लागणार आहेत.
सातारा जिह्यातील सातारा, कराड, वाई पाचगणी, महाबळेश्वर आदी आठही नगरपालिकांची मुदत संपलेली असून नव्याने निवडणुका लागण्या करिता प्रभाग रचना जाहीर करण्याच्या अनुषंगाने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकायांनी या प्रस्तावावर सही करण्याचे कामकाज उरले होते. सर्व जिह्यातील नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचे व इच्छुक उमेदवारांच्या नजरा याकडे लागून राहिल्या होत्या. त्यातच आरक्षणाचे घोंगडे अजुनी भिजत राहिलेले आहे. असे असताना आज जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी उशिरा प्रारुप प्रभाग रचना यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. ब आणि क वर्गातल्या नगरपालिका या प्रस्तावाला ही मान्यता दिली असून वर्गाच्या नगरपालिकांना निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार दि. 10 ते 17 यादरम्यान हरकली दि. 18 ते 22 या दरम्यान आलेल्या हरकती व सुनावणी होणार आहे. तसेच दि. 22 ते 25 या दरम्यान सुनावणीचा अहवाल तयार करून तो शासनाकडे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे एकदाचे प्रारूप आराखडय़ाची मान्यता मिळाल्याने इच्छुकांनी आणखी वेगाने काम करायला सुरुवात केली आहे. तर मतदारांना आपल्या प्रभागात इच्छुक कोण असेल तो कसा आपला नगरसेवक असावा असे तर्क वितर्क लढवले जात आहेत.