प्रतिनिधी /कुंकळ्ळी
ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ रिसर्च सेंटर, आसगाव-म्हापसा येथील औषध निर्माणशास्त्राच्या साहाय्यक प्राध्यापिका प्रभात बाबाजी (विनीत) देसाई यांना आर. के. विश्वविद्यालय, राजकोट-गुजरात या विद्यापीठाने फार्मसी क्षेत्रातील डॉक्टरेट (पीएच. डी.) प्रदान केली आहे. त्यांनी पीएच. डी. च्या दरम्यान तीन शोधनिबंध प्रकाशित केले. तसेच एक आंतरराष्ट्रीय व एका राष्ट्रीय परिषदेमध्ये भाग घेतला.
आर. के. स्कूल ऑफ फार्मसीस, राजकोट यांचे डॉ. पंकज कपूर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. प्रभात यांचे शिक्षण मारिया बॉम्बिनो कॉन्व्हेंट स्कूल, कुंकळ्ळी व पार्वतीबाई चौगुले कॉलेज, मडगाव तसेच बी. फार्म. व एम. फार्म. चे शिक्षण फार्मसी कॉलेजमध्ये झाले आहे. या यशाबद्दल प्रभात यांचे कार्यकारी मंडळ, प्राचार्य व कर्मचारी वर्ग, ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ रिसर्च सेंटर, म्हापसा तसेच मित्रपरिवार, समाजबांधव आणि कुटुंबियांकडून अभिनंदन होत आहे. प्रभात या एमपीटीचे माजी मुख्य अकाउन्टंट कै. विठोबा बाबाजी देसाई यांच्या स्नुषा व कुंकळ्ळीतील रहिवासी आणि सर्व्हे व लँड रेकॉर्ड्स खाते, पणजी यांचे माजी निरीक्षक प्रभाकर सदा नाईक देसाई यांच्या कन्या आहेत.