मेलबोर्न
ऑस्ट्रेलियात प्रत्येक वर्षी खेळविल्या जात असलेल्या महिलांच्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेत सहभागी होत असलेल्या मेलबोर्न रिनेगेड्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक टीम कॉयली यांनी आपले प्रशिक्षकपद सोडल्याची माहिती या संघाच्या फ्रांच्यायजीनी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या गेल्या तीन हंगामात मेलबोर्न रिनेगेड्स संघाचे प्रमुख प्रशिक्षकाची जबाबदारी टीम कॉयली यांच्यावर सोपविण्यात आली होती. गेल्यावर्षीच्या बिग बॅश हंगामात मेलबोर्न रिनेगेड्सने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.