दुसऱया दिवशी मागितली सुटी
नोकरी करताना स्वतःच्या बॉसकडे सुटी मागणं सर्वांनाच जमत नाही. अनेकांना सुटी मंजूर करून घेण्यासाठी खोटं बोलावं लागतं. पण खरंखुर कारण सांगून सुटी घेणारे आणि खरं कारण ऐकून सुटी देणारेही खूप कमी कर्मचारी आणि बॉस असतात.
सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यात एका कर्मचाऱयाने केलेल्या चांगल्या कामाचं बक्षीस म्हणून त्याची पगारवाढ करण्यासह प्रमोशनही देण्यात येते. पण दुसऱयाच दिवशी संबंधित कर्मचारी बॉसकडे सुटीसाठी विनंती करतो, बॉस आणि कर्मचाऱयामधील सुटीचे हे संभाषण सध्या व्हायरल झाले आहे.
एका आघाडीच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर सर्वप्रथम ही पोस्ट करण्यात आली. ‘एका मुलाला त्याने पेलेल्या चांगल्या कामासाठी उत्तम पगारवाढ दिली आणि दुसऱयाच दिवशी मला हा मेसेज मिळाला…अशाप्रकारे तुम्ही ब्रिटिश असल्याचे कळते’ असा कॅप्शनसह ही पोस्ट शेअर करण्यात आली होती.
व्हायरल स्क्रीनशॉटनुसार कर्मचारी सकाळीच सुटीची विचारणा करतोय, “गुड मॉर्निंग…क्षमस्व, पण मी आज सुटी घेऊ शकतो का ? काल रात्री आनंद साजरा करण्यासाठी ड्रिंक घेतली आणि आता मी प्रचंड नशेत आहे… खूप हँगओव्हर असून अजून काही तास तरी त्याची नशा उतरण्याची शक्यता नाही’’ असा मेसेज कर्मचारी स्वतःच्या बॉसला करतो. कर्मचाऱयाने सांगितलेले खरं कारण बघून बॉस खूश होतो आणि “नक्कीच तुला सुटी हवीये…आणि ज्या कारणासाठी तुला सुटी हवीये ते खूप मोठं कारण आहे…तू सुटीसाठी पूर्णपणे पात्र आहेस…’’ असा प्रतिसाद देतो.
बॉसचा रिप्लाय बघून काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी सुटीसाठी हो म्हणणाऱया बॉसचं तोंडभरून कौतुक केले आहे.