प्रतिनिधी / इचलकरंजी
मुंबईतील बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने इचलकरंजी येथील शहापूर एसटी आगार समोर सुरू असलेल्या उपोषण स्थळीच एसटी कर्मचाऱ्याचा तीव्र हृदयविकाराने मृत्यू झाला.
शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे (वय 31 रा.मूळ रा.अक्कलकोट )असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकारानंतर एसटी कर्मचारी यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत होता. या प्रकरणाला दोषी असलेल्या संबंधितावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला.
इचलकरंजी शहापूर आगार समोर सुरू असलेल्या उपोषणात मुंजाळे हे सहभागी झाले होते. मुंबई येथील बैठकीची बातमी त्यांनी मोबाईलवर पाहिली आणि त्यांना तीव्र झटका आला. त्यांना तातडीने आयजीएम शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याठिकाणी मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.