प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महाराष्ट्र संघटनेमार्फत प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले. शुक्रवारी कर्मचाऱयांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
यामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते. संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने न्यायिक व प्रलंबित मागण्यांचा शासन स्तरावरून विचार होत नसल्याने कर्मचारीवर्गाची गळचेपी सुरू आहे. या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. कर्मचारी विरोधी धोरणाला विरोध म्हणून राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. यापूर्वी काळ्य़ा फिती लावून आंदोलन करण्यात आले होते. तरी शासनाने दखल न घेतल्याने कर्मचाऱयांनी निदर्शने केली. जिह्यातील महसूल, रूग्णालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोषागार कार्यालय, जिल्हा मनोरूग्णालय, जिल्हा तंत्रशिक्षण विभाग यासह इतर विभागातील कर्मचाऱयांनी संपात सहभाग घेतला. तर निदर्शनाप कामगारइनेते सुधाकर सावंत, जिल्हा शाखेचे अध्यक्ष आर. डी. मोहिते, कार्याध्यक्ष घोसाळे, सचिव एम. वाय. पठाण आदी सहभागी झाले होते.
..