विज खात्याच्या कंत्रीटी कामगारांची मागणी कार्यालयासमोर धरणे निदर्शने
प्रतिनिधी /पणजी
विज खात्यातील कंत्राटी कामगारांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी काल मंगळवारी आयटकच्या झेंडय़ाखाली विज खात्याच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. विज खात्यात गेल्या कित्येक वर्षापासून कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱया कर्मचाऱयांना डावलून नव्यने कामगारांची भरती केली जात असून त्यांना नोकरीत कायम केले जात आहे. कंत्राटी कामगारांच्या नोकरीला कोणतीच सुरक्षा नसून कायम टांगती तलवार. आमच्या मागण्या त्वरीत पूर्ण करा अशी मागणी कर्मचाऱयांनी केली आहे.
यावेळी विज खात्याचे 60 कामगारासह आयटकचे प्रसन्ना उत्तगी, राजू मंगेशकर कामगारनेते क्रिस्तोफर फोन्सेका, ऍड. सुहास नाईक, कांमगार संघटनेचे अध्यक्ष कारलोस फालेरो, अबेल डिसल्वा व अन्य उपस्थित होते.
विज खात्यात लाईन हेल्पर म्हणून 321 कामगार कंत्राटी पध्दतीवर गेल्या 12 ते 14 वर्षापासून काम करीत आहेत. विद्यमान सरकारने 555 लाईन हेल्पर व अन्य पदांसाठी जागा भरायच्या असल्याची जाहिरात प्रसिध्द केली आहे. नव्या भरतीसाठी मुलाखतीही घेण्याचे सुरु झाले मात्र कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱया कामगारांना नोकरीत कायम का केले जात नाही असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे. अगोदर 321 कामगारांना नोकारीत कायम करा आणि नंतर राहिलेल्या जागा भरा अशी मागणी त्यांनी केली आहे. आमच्यावर हा घोर अन्याय होत असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जातीने आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत आम्ही विजखात्यात तीन मंत्री पाहिले मात्र आम्हा नोकरीत कायम करण्याचा वितार कुणीच केला नाही. कंत्राट संपल्यानंतर काही दिवस घरी पाठवतात आणि नंतर पुन्हा कंत्राटी पध्दतीवर नोकरीत रुजू करून घेतात. दरवेळी प्रत्येक मंत्री आम्हाला डावलून आपल्या मतार संघातील लोकांना विजखात्यात कामयस्वरूपी नोकरी देत असतात. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरु आहे आम्ही मात्र कायम कंत्राटी पध्दतीवर आहोत. आमचे प्रश्न वेळीच सोडवले नाही तर योग्य तो मार्ग अवलंबीला जाईल असा इशआराही कामगारांनी दिला आहे. सकाळी 130 वाजता धरणे निदर्सनाला सुरुवात झाली नंतर दुपारी 12.30 शांततेने कामगार आपापल्या घरी गेले.