वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सणासुदीच्या वातावरणामुळे डिसेंबर 2020 मध्ये प्रवासी वाहनांची (पीव्ही) किरकोळ विक्री 23.99 टक्क्यांनी वधारुन 2,71,249 वर पोहचली आहे, अशी माहिती ऑटोमोबाईल डीलर संघटना फाडा यांच्याकडून देण्यात आली आहे.
फाडाच्या आकडेवारीनुसार प्रवासी वाहनांची डिसेंबर 2019 मधील विक्री 2,18,775 युनिट होती. देशातील 1,477 विभागीय परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) 1,270 वाहनांची नोंद केल्याची माहिती आहे. डिसेंबरमध्ये दुचाकी वाहन विक्री 11.88 टक्क्यांनी वधारुन 14,24,620 युनिट राहिली असून जी मागील वर्षातील समान कालावधीत 12,73,318 होती. व्यावसायिक वाहन आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र डिसेंबरमध्ये घट झालेली दिसली आहे. व्यावसायिक वाहनांची डिसेंबरमध्ये विक्री 13.52 टक्क्यांनी घटली आहे.