मागणीतही वाढीचा अंदाज – प्रवासी वाहनांचा वापर वाढला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुसऱया कोरोना लाटेचा असर ओसरल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होत असून येणाऱया काळामध्ये प्रवासी वाहनांच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्मयता क्रिसिल या संस्थेने वर्तवली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये प्रवासी वाहनांच्या मागणीच्या माध्यमातून 20 ते 22 टक्के इतका महसूल प्राप्त केला जाऊ शकतो असेहीक्रिसीलने म्हटले आहे.
कोरोनापूर्व परिस्थिती ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये परतली असून वाहनांच्या मागणीमध्ये ग्राहकांकडून लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. मात्र महसूल प्राप्त करण्यामध्ये साधारण वर्षभराचा कालावधी लागू शकतो असाही अंदाज व्यक्त केला आहे.
मागणीत सुधारणा
प्रवासी वाहनांच्या मागणीमध्ये हळूहळू सुधारणा होत असून महसूलामध्ये वाढ होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. शहरी आणि उपनगरी भागामध्ये सुरक्षिततेसाठी म्हणून प्रवासी वाहनांचा वापर मोठय़ा संख्येने केला जात आहे. या आधी कोरोनाच्या दरम्यान मागणीमध्ये मोठय़ा प्रमाणात परिणाम जाणवला होता. पण कोरोनाची लाट ओसरल्यावर मात्र सदरच्या प्रवासी वाहनांना पुन्हा एकदा ग्राहकांनी मागणी नोंदवण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रासह इतर राज्यांचा वाटा
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान या सारख्या राज्यांकडून वाहन विक्रीमध्ये 40 ते 45 टक्के मागणी होत असते. त्या काळामध्ये नेमकी विक्री प्रभावित झाली होती. जूनच्या मध्यापासून वाहन मागणीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसली आहे. हाच विक्रीचा ट्रेंड पुढे चालू राहील अशी शक्मयता आहे.
किंमत वाढीने महसूलात वाढ
विविध वाहनांच्या किमतीमध्ये दरम्यानच्या काळात चार ते सहा टक्के इतकी वाढ करण्यात आली असल्यामुळे याचा फायदा महसूल वाढीमध्ये दिसून येणार आहे असेही क्रिसिलने म्हटले आहे. एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे शोरूम्स बंद होती. त्यामुळे नव्या वाहनांच्या नोंदणीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट दिसली होती. याचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात बसला त्यानंतर कोरोनाचा असर कमी झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन मागे घेण्यात आला आणि व्यवहारांना गती प्राप्त झाली. यात ऑटोमोबाईल क्षेत्रातील विविध शोरूम्सही पुन्हा खुली झाल्याने ग्राहकांचा वाहन खरेदीकडे कल दिसून आला.