नवी दिल्ली :
देशामध्ये प्रवासी वाहन विक्री ऑगस्ट महिन्यात 14.16 टक्क्मयांनी वधारुन 2,15,916 युनिट्वर राहिली आहे. मागील वर्षात याच समान महिन्यात 1,89,129 वाहन विक्री राहिल्याची नोंद आहे, अशी माहिती सियाम यांच्याकडून देण्यात आली आहे. समिक्षकांच्या माहितीनुसार यामध्ये दोन वाहनांची विक्री तीन टक्क्यांनी वधारुन 15,59,665 वर राहिली आहे. तर मागील ऑगस्टमध्ये हा आकडा 15,14,196 वर राहिल्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये मोटारसायकलीची विक्री 10.13 टक्क्मयांनी वाढून 10,32,476 वर आणि स्कूटरची विक्री 12.3 टक्क्यांच्या तेजीसोबत 4,56,848 वर राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.