प्रतिनिधी /पेडणे
प्रवीण आर्लेकर यांचा भाजप पक्षात आज प्रवेश होणार असून प्रवीण आर्लेकर यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रामाला मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत , केंद्रीय मंञी श्रीपाद नाईक , भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंञी तथा गोवाचे निरीक्षक देवेंद्र फडणवीस , मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे , मांदे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस , आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
व्हायकाऊंट हायस्कूल पेडणे येथे सायंकाळी 4.वाजता पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित केला आहे.
मालपे पेडणे येथे रविवारी राञी पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रवीण आर्लेकर यांच्या समर्थकांची बैठक झाली.याबैठकीला प्रवीण आर्लेकर , पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस , धारगळचे सरपंच प्रदिप उर्फ भूषण नाईक, नरेश कोरगावाकर , सरपंच सरस्वती नाईक , उपसरपंच सुबोध महाले, पंच दीपक तांबोस्कर, माजी सरपंच संगीता गावकर, माजी सरपंच स्वाती गवंडी, पंच मंगलदास किनळेकर, पंच प्रशांत राव , आदी उपस्थित होते.
यावेळी प्रवीण आर्लेकर यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला मतदारसांघातून मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस , सरपंच भूषण नाईक आदीनी यांनी यावेळी प्रवीण आर्लेकर यांना येत्या विधानसाभा निवडणूकीत पूर्ण पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले. राजन म्हापसेकर यांनी स्वागत आणि प्रास्तविक केले.