कुरुंदवाड / प्रतिनिधी
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महारापूरात शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावात अडकलेल्या आजारी लोकांसाठी जीवाची पर्वा न करता धडपडणारे डॉ. किरण पवार यांच्या स्वतः च्या पवार क्लिनिक चे महापूरात नुकसान होवून देखील अद्याप मदत मिळाली नाही. पंचनामा करण्याची लेखी मागणी केली असताना पंचनामा न झाल्याने दुसऱ्या टप्प्यात ही मदत आली नसल्याने प्रशासनाच्या कारभारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
2019 ऑगस्ट महिन्यात आलेल्या महारापूरात शिरोळ तालुक्यात सर्वत्र नुकसान झाले. कृष्णा आणि पंचगंगा मुळे नदीकाठलगत असणाऱ्या गावात महापूराने थैमान घातले होते. यावेळी नृसिंहवाडी चे रहिवासी असलेले डॉ. किरण पवार यांनी प्रशासन बरोबर आर्मीच्या यांत्रिक बोटीतून स्वतःचा जीव धोक्यात घालून कुरुंदवाड, नृसिंहवाडी, गौरवाड, आलास, , औरवाड, बुबनाळ सह परिसरातील पूरग्रस्त गावात आरोग्य सेवेचे व्रत जोपासले. स्वत चे कुंरूदवाड येथील पवार क्लिनिक मध्ये तीन ते चार फूट पाणी आल्याने नुकसान झाले असताना पवार यांनी शिरोळ तहसील कार्यालयाच्या माध्यमातून महापूराच्या प्रलंयामधये वाट काढत आजारी रूग्णांवर सेवा भावी वृत्तीने उपचार केले. महापूरानंतर शासनाच्या वतीने नुकसान गस्त दुकाने, शेती सह खाजगी रूग्णालय याचे पंचनामे होवून भरपाई मिळाली. यावेळी डॉ. पवार यांच्या कुरूंदवाड येथील पवार क्लिनिक चा पंचनामा झाला नाही . लेखी मागणी करून ही दुसऱ्या टप्प्यात ही पंचनामा झाला नाही. . याबाबत कुंरूदवाड चे मुख्याधिकारी निखिल जाधव, तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ यांच्या कडे लेखी तक्रार करुन देखील डॉ. पवार यांना मदत मिळाली नाही. पूरग्रस्तांची दुसरी यादी जाहीर होवून देखील यादीतून पवार यांचे नाव आले नाही . याबाबत आता कोरोना मुळे याकडे प्रशासन टाळा टाळ करीत आहे.
दरम्यान तालुक्यात महापूरात बोगस पंचनामे करून नुकसान भरपाई झाली नसताना अनुदान लाटले आहे. असे असताना महापूरात जीवावर उदार होऊन आरोग्य दूत बनलेल्या डॉ. पवार यांच्या मागणी ला तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी न्याय देणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापूरानंतर कोरोनात प्रशासनाबरोबर मी आरोग्य सेवेचे काम करीत आहे. मात्र माझ्या कुंरूदवाड येथील क्लिनिक चे महापूरात नुकसान झाले. याबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी लेखी मागणी केली होती. मी रीतसर तक्रार दिली आहे. याबाबत दोषी पंचनामा करणाऱ्या समितीवर कारवाई करुन त्याच्या कडूनच भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
– – डॉ. किरण पवार