ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. किरण कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबईतील एका दवाखान्यात मला इतर उपचारांसाठी जायचे होते. त्यासाठी माझ्या काही टेस्ट घेण्यात आल्या. त्यावेळी कोरोना चाचणीही करण्यात आली. 14 मे रोजी माझे रिपोर्ट आल्यावर मला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. मला सर्दी, ताप, खोकला अथवा अशक्तपणा नाही. कोरोनाचे कोणतेही लक्षण नसल्याने मला रुग्णालयात उपचार घेण्याची गरज पडली नाही. माझे घर मोठे असल्याने मी घरीच उपचार घेत आहे.
सध्या मी घराच्या वरच्या मजल्यावर सेल्फ आयसोलेशनमध्ये राहतो. बाकी कुटुंब खालच्या मजल्यावर राहते. माझी पुढील कोरोना टेस्ट 26 मे रोजी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
किरण कुमार यांनी अनेक हिंदी, गुजराती आणि भोजपुरी सिनेमात काम केले. खलनायक म्हणून सिनेमासृष्टीत त्यांना ओळख मिळाली.