प्रवीण कांबळे/ लांजा :
पावसाळा म्हटला की, पर्यटकांना आकर्षित करतात ते धबधब़े तालुक्यातील अशाच सुप्रसिद्ध असलेल्या खोरनिनको धबधब्याखाली दरवर्षी दूरवरील पर्यटक न चुकता मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत असतात़ मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोरनिनको ग्रामपंचायतीने हा प्रसिद्ध धबधबा अनिश्चित काळासाठी बंद केला आह़े त्यामुळे यावर्षी पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आह़े
पावसाळ्य़ातील निसर्गाची मुक्तहस्ते उधळण न्याहाळत मनसोक्त भिजायचे असेल तर लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधबा क्षेत्र हे एकमेव ठिकाण पर्यटकांच्या नजरेसमोर येते. खोरनिनको धबधबा सर्वच वयोगटातील पर्यटकांना उपयुक्त ठरत़ो यामुळे स्थानिकांसह दूरवरील पर्यटक या धबधब्याच्या सान्निध्यात गेल्या काही वर्षापासून मोठय़ा प्रमाणात वळले आहेत़ सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीमध्ये वसलेल्या तालुक्यातील खोरनिनको धरणावर लघु पाटबंधारे विभागाने मानवनिर्मित धबधबा निर्माण केला आह़े गेल्या अनेक वर्षापासून हा धबधबा पर्यटकांचा आकर्षण केंद्रबिंदू ठरला आह़े हिरव्यागार सह्याद्रीच्या पर्वतरांगा, दुधाळ धुके, दृष्टीस पडणारे वन्यप्राणी, पक्षी, थंडगार वारा, सह्याद्री कडय़ांवरुन कोसळणारे लहान धबधबे यांसह धरणाच्या एका बाजूला सांडव्याद्वारे तयार केलेल्या पायऱया हे सर्व पर्यटकांसाठी नेत्रसुखदायक ठरते आह़े खडकाळ दगडांवरुन तयार केलेल्या उंच पायऱयांवरुन कोसळणारे दुधाळ पाणी, पाण्याचे तुषार एकंदरीत खोरनिनको धबधबा सर्वांनाच आकर्षित करतो आह़े
उंच पायऱयांवरुन केसळणाऱया धबधब्याच्या पाण्याखाली पर्यटकांना अगदी मनमुराद आनंद घेता येत़ो या धबधब्याचा आनंद उपभोगण्यासाठी रत्नागिरी जिह्यासह कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे या मोठय़ा शहरांमधील पर्यटक भेट देत असतात़ शनिवारी व रविवारी या धबधबा क्षेत्रावर मोठय़ा प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात़ सध्या पावसाचाही जोर वाढू लागला असून धबधबा ओसंडून वाहू लागला असून पर्यटकांना आकर्षित करु लागला आह़े मात्र यावर्षी शासनाच्या निर्देशानुसार हा धबधबा खोरनिनको ग्रामपंचायतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आह़े धरण क्षेत्रामध्ये कोणालाही फिरकता येणार नाही, असे आवाहन करण्यात आले आह़े ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामकृती दल सदस्य यांनी दक्षता म्हणून निगराणी ठेवली आह़े या ठिकाणी पाटबंधारे विभाग व ग्रामपंचायतीने सूचनाफलक लावले आहेत़ यामुळे यावर्षी प्रसिद्ध खोरनिनको धबधव्याचा आनंद पर्यटकांना घेता येणे अशक्य बनले आह़े
..