ऑनलाईन टीम / नगर :
रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कडय़ावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱयांना यश आले. त्यांच्या जाण्याने गिर्यारोहणप्रेमींवर शोककळा पसरली आहे.
अरुण सावंत हे काल रॅपलिंगसाठी 30 जणांच्या टीमसह हरिश्चंद्रगडावर आले होते. हरिश्चंद्र गडाहून माकडनाळ या रॉक वर चढाई करण्यासाठी टीमला अरूण सावंत लीड करत होते. दरम्यान, कोकणकडय़ाहून आडवा रोप बोल्ड करायच्या प्रयत्नात तो फॉल झाला आणि ते 550 फूट खोल दरीत खडकांवर कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. काल सायंकाळपासून आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी आणि स्थानिकांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह खोल दरीत आढळून आला.
अरुण सावंत हे महाराष्ट्रातले सर्वात जुने अनुभवी टेकर होते. ड्युक्स नोज लोणावळा ची मोहीम यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक म्हणून त्यांची ओळख आहे. सह्याद्रीतल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या टेकिंगच्या जागा सांधण व्हॅली, कोकणकडा रॅपलिंग, थिटबी वॉटरफॉल रॅपलिंग या सारख्या जागा शोधणारे ते अवलिया गिर्यारोहक होते.