सांगली / प्रतिनिधी
हरिपूर येथील शतक महोत्सवी मोफत वाचनालयास गुरुवार २३ रोजी दुपारी चार वाजता ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तसेच लेखिका व कवयित्री श्रीमती अरुणा ढेरे या भेट देणार असून; त्यावेळी आपल्याकडील काही मौलिक ग्रंथ त्या या मोफत वाचनालयास भेट देणार आहेत . तसेच यावेळी वाचनालयाच्या व हरिपूर ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यावेळी “वाचन” या विषयावर त्या आपले विचार मांडणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रा. एम.एस. रजपूत, आभाळमायाचे प्रमोद चौगुले, प्राचार्य डॉ.डी.जी कणसे, प्राचार्य डॉ.आर.जी कुलकर्णी, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर आदी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन मोफत वाचनालय हरिपूर,रोटरी समाज दल व ग्रामपंचायत हरीपूर यांचे संयुक्त विद्यमाने केले आहे.