प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी टिचर्स टेनिंग कॉलेजच्या प्राचार्या एच. पी. परूळेकर या 33 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल त्यांचा बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण संस्थेचे सेवंतीलाल शाह, व्ही. एल. आजगावरकर, ज्ञानेश कलघटगी, हिमांगी प्रभू, व्यंगचित्रकार जगदीश कुंटे, हेरवाडकर शाळा व मराठी टिचर्स कॉलेजचे शिक्षकवृंद उपस्थित होते.