2 ऑक्टोबरपर्यंत चालणार अभ्यासक्रम : जगभरातून नोंदणी
वृत्तसंस्था इंदौर
इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंदौरने संस्कृतमधील प्राचीन वैज्ञानिक ग्रंथांना मूळ भाषेत वाचणे आणि त्याचा अर्थ समजविण्यासाठी एक विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्राचीन ज्ञानाला पुन्हा उजाळा देण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जात आहे. संस्कृत भारती मध्य क्षेत्रमसहित आयआयटी मुंबई आणि आयआयटी इंदौरचे तज्ञ या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत लोकांना भारताच्या पुरातन साहित्यातील ज्ञान संस्कृतमध्ये देत आहेत. हा अभ्यासक्रम अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेकडून पुरस्कृत असून तो 22 ऑगस्टपासून 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
या अभ्यासक्रमात 62 तास ऑनलाईन वर्ग चालणार असून त्यासाठी जगभरातील सुमारे 750 विद्यार्थ्यांनी नाव नोंदविले आहे. भारतीय प्राचीन गंथांमध्ये गणितीय आणि वैज्ञानिक ज्ञानाचा समृद्ध वारसा असून त्याबद्दल सद्यपिढी अनभिज्ञ आहे. या अभ्यासक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना संशोधन, नवोन्मेष, अध्ययन आणि संस्कृतमध्ये गणित तसेच विज्ञान शिकविले जात आहे. अभ्यासक्रम दोन हिस्स्यांमध्ये विभागण्यात आल्याची माहिती आयआयटी इंदौरचे संचालक प्राध्यापक नीलेश कुमार यांनी दिली आहे.
पहिल्या हिस्स्य़ात विद्यार्थ्यांना भाषेची समज व्हावी याकरता संस्कृतचे धडे दिले जाणार आहेत. तर दुसऱया हिस्स्यात त्यांना संस्कृतमध्ये शास्त्राrय गणित शिकविण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाच्या दुसऱया हिस्स्यात सामील विद्यार्थ्यांना मूल्यांकनासाठी एक पात्रता परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यात यशस्वी होणाऱया विद्यार्थ्यांना एक प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. दुसऱया हिस्स्यात आयआयटी मुंबईचे प्राध्यापक के. रामसुब्रमण्यम आणि डॉ. के. महेश सामील होणार आहेत. संस्कार भारतीचे प्रमोद पंडित, मयुरी फडके आणि प्रवेश वैष्णव अभ्यासक्रमाच्या पहिल्या हिस्स्याची जबाबदारी सांभाळणार आहेत.