अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करून केला खून : येळ्ळूर बसस्टॉपनजीक घडली घटना
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर बस स्टॉपनजीक एका वृद्धाच्या धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना वडगांव येथे घडली. सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
महादेव जाधव (अंदाजे वय 55 रा. भारतनगर शहापूर) असे त्या मृत वृद्धाचे नाव आहे. माहिती मिळताच शहापूरचे पोलिस निरीक्षक राघवेंद्र हवालदार सहकाऱयांसह तातडीने घटनास्थळी दाखल होत तपासाला प्रारंभ केला आहे.
हा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला आणि कुणी केला याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेनंतर या परिसरात काहीकाळासाठी तणाव निर्माण झाला होता.