रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टी ठरवतो, अनेक उद्दिष्टय़े ठरवतो. आपली स्वप्ने, आपल्या आकांक्षा निश्चित करतो. पण त्या सगळय़ाच पूर्ण होतात असे नाही. अनेकदा ध्येयपूर्तीसाठी आपण ठरवलेला काळ पुरसा ठरत नाही, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एखादी गोष्ट मानसिक व वैचारिक पातळीवर ठरवल्यापासून ती सत्यात उतरेपर्यंत होणारी प्रक्रिया आपल्याला माहिती नसते.
प्राणिक हीलिंगमधील ‘क्रियाशक्ती’ हा एक अप्रतिम वर्ग आपल्याला ही प्रक्रिया उलगडून सांगतो. दोन दिवसांच्या या वर्गात एखादा विचार प्रत्यक्षात उतरेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी घडतात, आपले विचार, आपल्या भावना, आपली कृती या प्रक्रियेला कशाप्रकारे प्रभावित करतात या सर्व गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात.
यशस्वी होण्यासाठी, आपले उद्दिष्ट साधण्यासाठी उपयोग असलेली मानसिकता, विचार, भावना व कृतींचा जाणीवपूर्वक उपयोग करून एखादी गोष्ट अत्यंत कमी वेळात प्रत्यक्षात कशी उतरवावी हे आपण शिकतो. उत्तम आरोग्य, आर्थिक सुबत्ता, ध्येयपूर्ती यासाठी अनुकूल परिस्थिती कशी निर्माण करावी हे शिकतो. आपले विचार कृतीत बदलण्यासाठी हजारो वर्षे ऋषीमुनींकडून वापरल्या गेलेल्या परंतु सामान्य लोकांना अज्ञात असलेल्या हस्त मुद्रा व डोळय़ांच्या मुद्रांचा अभ्यास तसेच काही विशिष्ट ऊर्जा यांचा अभ्यास आपण या वर्गात करतो. आपल्या आयुष्यात, व्यवसायात योग्य प्रकारच्या व्यक्तींना कसे सामावून किंवा जोडून घ्यायचे, यशाच्या आड येणाऱया नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक मानसिकता कशा दूर करायच्या याचे प्रभावी तंत्र शिकवले जाते. प्राणिक हीलिंग ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या माध्यमातून वेगवेगळय़ा भागात पोहोचत आहे. एक नवीन विषय वाचकांना वाचायला मिळत आहे. प्राणिक हीलिंग या तंत्राबद्दल वाचून जे प्रश्न वाचकांनी विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आज या लेखातून देणार आहे.
प्राणिक हीलिंगने कोणते रोग बरे होण्यास मदत होते?
कोणताही शारीरिक अथवा मानसिक त्रास/व्याधी प्राणिक हीलिंगने बऱया होऊ शकतात. डोकेदुखी, सर्दी, खोकला, डोळय़ांचे, श्वसनाचे, पोटाचे विकार, ताप, थकवा, अशक्तपणा अशा साध्या व किरकोळ त्रासांपासून हृदयरोग, कर्करोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब, व्हर्टिगो, मूत्रपिंड आणि मूत्राशयाचे विकार, सांधेदुखी, संधिवात तसेच अस्थीसंस्थेचे विकार यासारख्या जुनाट व गंभीर व्याधींवरही प्राणिक हीलिंगचे उपचार करता येतात. भावनात्मक किंवा मानसिक त्रासामध्येदेखील म्हणजे ताणतणाव, विनाकारण चिंता, भीती, काळजी करण्याची प्रवृत्ती, मानसिक असंतुलन, भित्रा स्वभाव, नैराश्य, मनात साठून राहिलेले दुःख, तापट, हिंसक किंवा व्यसन वृत्ती यावर प्राणिक हिलींगचे उपचार प्रभावी ठरल्याचा अनुभव खूप लोक सांगतात.
प्राणिक हीलिंग सुरू असताना इतर औषधे बंद करायची का?
प्राणिक उपचार हे तुमच्या ऊर्जा शरीरावर केले जातात तर वैद्यकीय औषधोपचार हे भौतिक शरीरासाठी असतात. या ट्रीटमेंटमध्ये वैद्यकीय उपचार थांबवण्याची गरज नसते. याउलट सुरू असलेल्या औषधोपचारासाठी प्राणिक हीलिंगचे उपचार पूरकच ठरतात आणि व्याधी निवारणही जलद गतीने होते. जसे जसे व्याधी निवारण होते त्याचप्रमाणे फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने औषधांचा डोस कमी करत करत बंद करावा. मात्र हे फॅमिली डॉक्टरच्या देखरेखीखाली करावे हे महत्त्वाचे.
प्राणिक हीलिंग उपचारास किती वेळ लागतो? त्याचे साईड इफेक्ट असतात का?
प्राणशक्ती उपचारास एका सत्रास पाच मिनिटापासून ते अर्ध्या पाऊण तासांपर्यंत साधारण वेळ लागू शकतो. उपचारास लागणारा वेळ हा रोगाच्या गंभीरतेवर अवलंबून असतो. नवीन अथवा शिकाऊ उपचारकास लागणारा वेळ हा वेगवेगळा असू शकतो. शिकाऊ उपचारकास अर्धा तास लागत असेल तर अनुभवी उपचारकास त्याच ट्रीटमेंटला 5 ते 10 मिनिटेही लागू शकतात. अनुभवसंपन्नता व उपचारपद्धतीबद्दल असलेले सखोल ज्ञान हेच यास कारणीभूत असते. या उपचाराचे कोणतेही साइड इफेक्ट नसतात. कारण ऊर्जा ही वैश्विक आहे व ती चांगलीच असते. एखाद्या ठिकाणी तिचे वाजवीपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाण हेच व्याधीचे मूळ कारण असते. तो समतोल साधण्यासाठी उपचारक शरीराला मदत करतो म्हणून त्याचे साईड इफेक्ट नसतात.
प्राणिक हीलिंग उपचार किती वेळा घ्यावे लागतात?
प्राणिक हीलिंग उपचार किती वेळ आणि किती काळ करावे लागणार हे बिघडलेल्या रोगस्थितीवर, त्याच्या गंभीरतेवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीवर उपचारांचा होणारा परिणाम हा वेगवेगळा असतो. पहिल्या चार ट्रीटमेंटमध्ये पेशंटचे शरीर कसे प्रतिसाद देत आहे हे कळते व त्यानुसार ट्रीटमेंटची वारंवारता कळते.त्रास वरवरचा असेल, व्याधी फार खोलवर गेलेली नसेल तर चार ट्रीटमेंटमध्ये व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते. मात्र आजार जर गंभीर स्वरुपाचा असेल तर वेळ लागू शकतो.
प्राणिक हीलिंग कोणाला शिकता येते?
16 वर्षांवरील कोणत्याही सज्ञान व्यक्तीला प्राणिक हीलिंग शिकता येते. त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी लागत नाही तसेच आध्यात्मिक उन्नतावस्था, असामान्य क्षमता, अलौकिक शक्ती किंवा व्याधी निवारण सिद्धी असण्याची गरज नाही. सर्वसामान्य बुद्धीक्षमता, पूर्वग्रह सोडून मोकळय़ा मनाने जाणून घेण्याची तयारी, तारतम्य भाव, विवेक बुद्धीचा वापर आणि थोडी चिकाटी जर असेल तर दोन दिवसांचा बेसिक प्राणिक हीलिंग सर्टिफिकेट कोर्स कोणालाही सहज पूर्ण करता येतो. उपचार पद्धतीत प्राविण्य मिळवण्यासाठी मात्र अभ्यास आणि सरावाची गरज असते. ज्यांना उपचारक म्हणून काम करावयाचे असेल त्यांच्यासाठी बेसिक प्राणिक नंतर ऍडव्हान्स प्राणिक हीलिंग आणि प्राणिक सायकोथेरपी हा सर्टीफिकेट कोर्स आहे. तत्पूर्वी उपचारकाने बेसिक तंत्र पद्धतीचा सराव केलेला असणे अपेक्षित आहे. प्रगत तंत्रपद्धती वापरताना उपचार करण्याचा पूर्वानुभव व आत्मविश्वास असणे गरजेचे असते. उपचारकने बेसिक प्राणिक हीलिंग पद्धतीत थोडय़ा फार प्रमाणात तरी प्राविण्य मिळवलेले असावे. प्रगत तंत्र पद्धती खूपच प्रभावी असल्यामुळे सराव व अनुभव आवश्यक आहे.
पेशंट परगावी असेल अथवा बिछान्याला खिळून असेल तर त्याला हे उपचार घेता येतील का?
प्राणशक्ती उपचार हे भौतिक शरीरावर केले जात नाहीत तर ते ऊर्जा शरीरावर केले जातात. या उपचारांमध्ये पेशंटला स्पर्श करण्याची आवश्यकता नसते तसेच यात कुठलीही औषधे दिली जात नाहीत. प्राणिक हीलिंग ही ऊर्जास्तरीय उपचार पद्धती आहे व ऊर्जा संपूर्ण विश्वात भरून राहिलेली आहे. पेशंट कुठेही असो, लौकिक अर्थाने पेशंट व उपचारक जरी दूर असले तरी ऊर्जेच्या दृष्टीने ते अंतर शून्य असते. त्यामुळे दुरून केलेले उपचारदेखील तितकेच प्रभावी ठरतात. यासाठी पेशंटच्या नात्यातील व्यक्तीने त्याचा फोटो घेऊन उपचार केंद्रामध्ये येऊन भेटावे. हे उपचार फोटोवरून व फोनवरून केले जातात व त्याचे परिणाम अत्यंत सकारात्मक असतात.
खाण्यापिण्याची बंधने सांभाळावी लागतात का?
प्राणशक्ती उपचार घेणाऱया व्यक्तीने खाण्यापिण्याची अगदी मोजकी बंधने सांभाळणे गरजेचे आहे. मुख्यतः आंबवलेले पदार्थ, जास्त मसालेदार, तिखट पदार्थ तसेच अति तेलकट व तुपकट पदार्थ शक्मयतो टाळावेत. कोणत्याही प्रकारचे व्यसन पूर्णपणे वर्ज्य आहे. प्राणशक्ती उपचार घेणाऱयाने आणखी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे छोटय़ा स्वरूपाच्या आजारांवर उपचार घेणाऱयांनी उपचारानंतर 12 तास आणि मोठय़ा/दीर्घ आजारासाठी उपचार घेणाऱयांनी उपचारानंतर 24 तास स्नान करू नये.
प्राणशक्ती उपचार पद्धती किंवा प्राणिक हीलिंग तंत्राद्वारे व्याधी निदानाचा कोणताही खर्चिक प्रकार नाही. महागडी औषधे, शस्त्रक्रिया नाहीत. पेशंटला स्पर्शही करावा लागत नाही. पेशंट परगावी किंवा परदेशी असला तरीही फोनवरून संपर्क साधून दूरस्थ उपचार पद्धतीच्या माध्यमातून उपचार करता येतात. मुख्य म्हणजे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत. पहिल्याच ट्रीटमेंटपासून गुण यायला सुरुवात होते. प्राणऊर्जेवर आधारित प्राणिक हीलिंगचा पाया हा शास्त्रीय आहे. प्राणिक हिलींग ही उपचार पद्धती मनाच्या प्रसन्नतेसाठी, तसेच शरीर स्वास्थ्यासाठी साहाय्यभूत ठरते. जर तुमची व्याधी औषधांमुळे बरी होत नसेल किंवा औषधे पुरेशी वाटत नसली तरी, तसेच तपासण्या, हॉस्पिटलच्या फेऱया आटोक्मयात आणायच्या असल्या तरी प्राणिक हीलिंग या उपचार पद्धतीची फार मदत होते.
आज्ञा अभिषेक कोयंडे