प्राण्यांशी बोलून, त्यांना आनंदी करण्याचा प्रकार
ऍलन डिक्सन प्राण्यांवर प्रेम करणारा अनोखा छायाचित्रकार आहे. तो प्राण्यांवर किती प्रेम करतो याचा अंदाज त्याची छायाचित्रे पाहूनच तुम्हाला येईल. कारण तो प्रथम प्राण्यांशी मैत्री करतो आणि त्यानंतर त्यांच्यासोबतची घट्ट मैत्री दर्शविणारी छायाचित्रे काढतो.
ऍलन प्राण्यांसोबत थोडा वेळ घालवितो, त्यांच्यासोबत खेळतो. त्रस्त आणि दुःखी प्राण्यांना तो आनंदी करतो आणि त्यानंतर मनाला आल्हाददायक वाटणारी छायाचित्रे काढून घेण्यात तो तरबेज आहे.
ऍलन केवळ छायाचित्रकारच नव्हे ऍनिमल व्हिस्पर देखील आहे. म्हणजेच प्राण्यांची भाषा त्याला येत नसली तरीही त्यांना काय वाटत असावे याचे योग्य आडाखे बांधण्याची त्याला हातोटी आहे. त्याचे इन्स्टाग्राम अकौंट पाहिल्यास प्राणी देखील मोठय़ा आनंदाने त्याच्यासोबत छायाचित्रे काढून घेत असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ऍलन मूळचा आयर्लंडचा आहे. पण प्राणीप्रेमापोटी तो जगभरातील अनेक देशांमध्ये फिरला आहे.