शिवक्रांती हिंदवी सेना संस्थेच्या वतीने निवेदन
प्रतिनिधी/ सातारा
राजधानी ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून ज्या प्रमाणे हजारो मावळे स्वराज्याच्या यज्ञ पुंडात धारातीर्थी पडले तीच प्रेरणा घेऊन मायभूमीच्या रक्षणाकरीता व स्वातंत्र्यसाठी क्रांतिकारी चळवळ व सैनिकी चळवळ याच मातीतून उभी राहिली आहे. त्यामुळे सातारा जिल्हय़ाची ओळख ही आजही शूरवीरांचा व क्रांतिकारीचा जिल्हा म्हणून आहे. जिल्हय़ातील अनेक सैनिकांनी देशाच्या रक्षणाकरीता आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे आपल्या हुतात्मा जवानांची नावे प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्याची शिवक्रांती हिंदवी सेना संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदाना द्वारे केली आहे.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल धनावडे, उपाध्यक्ष प्रविण कदम, सचिव शशिकांत चिकणे, रोहित जगताप, संकेत जांभळे, अभिजीत जांभळे आदी उपस्थित होते. यावेळी कुसबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास हुतात्मा जवान नवनाथ सुर्वे, मेढा येथील केंद्रास हुतात्मा जवान रवींद्र धनावडे, कुडाळ येथील केंद्रास हुतात्मा जवान सुरज मोहिते, गवडी येथील केंद्रास हुतात्मा जवान अशोक धनावडे, केळघर येथील केंद्रास हुतात्मा जवान तुकाराम ओंबळे, काटवली येथील केंद्रास हुतात्मा जवान अशोक जाधव, सोमर्डी येथील केंद्रास हुतात्मा जवान प्रथमेश पवार व मेढा येथील पोलीस स्थानकास हुतात्मा जवान शशिकांत मोरे यांचे नाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.