शालेय शिक्षण आणि साक्षरता खाते ः अधिकृत आदेश जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खाते यापुढे ‘शालेय शिक्षण आणि साक्षरता खाते’ या नावाने ओळखले जाणार आहे. शिक्षण खात्याचे सचिव एच. एस. शिवकुमार यांनी शुक्रवारी रात्री यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण शालेय शिक्षण कक्षेत समाविष्ट आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये देखील यासंबंधी उल्लेख आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे (सार्वजनिक शिक्षण खाते आणि पदवीपूर्व शिक्षण खात्यासह) नाव शालेय शिक्षण खाते म्हणून बदलणे योग्य असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले होते. अनेक राज्यांमध्ये शालेय शिक्षण खाते हेच नाव वापरात असल्याने कर्नाटकातही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे शालेय शिक्षण आणि साक्षरता खाते असे फेरनामकरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.