मुख्य कार्यकारी अधिकाऱयांचे आदेश : शिक्षक समिती सिंधुदुर्गने केला होता पाठपुरावा
प्रतिनिधी / ओरोस:
कोविड-19 प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्राथमिक शिक्षक जिल्हय़ात विविध ठिकाणी कोवीड डय़ुटी प्रंटलाईन वर्कर म्हणून करत आहेत. या प्राथमिक शिक्षकांना लसीकरण करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्यावतीने सातत्याने जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग अशा विविध स्तरावर प्राथमिक शिक्षकांना लसीकरण करण्याबाबत सततचा पाठपुरावा केला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन कदम, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे आदी पदाधिकारी सततच्या पाठपुरावा करताना उपस्थित होते.
जिल्हय़ातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता प्राथमिक शिक्षकांना चेकपोस्ट, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, रेल्वेस्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती आपत्ती निवारण कक्ष, ‘माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी’ कुटुंब सर्वेक्षण आदी ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. सुरुवातीला पोलीस, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना प्रंटलाईन वर्कर म्हणून कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले होते. परंतु, प्राथमिक शिक्षक हे सुद्धा प्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत असतानाही 45 वर्षाखालील शिक्षकांना लसीकरण करण्यात आले नाही. याबाबत प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्यावतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. जिल्हय़ातील बरेच प्राथमिक शिक्षक कोवीड संसर्गबाधित होऊन उपचार घेत आहेत. आतापर्यंत तीन शिक्षकांचा कोवीडमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना लसीकरण करण्याबाबत सातत्याने जिल्हाभरातील शिक्षकांकडून मागणी होत होती.
जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनीही प्राथमिक शिक्षकांना लसीकरण करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना पत्र देऊन सूचना दिल्या. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी प्राथमिक शिक्षकांना प्रंटलाईन वर्कर म्हणून लसीकरण करण्याबाबत आदेश निर्गमित केले. त्यामुळे शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, जि. प. उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदींचे आभार मानण्यात येत आहेत.