नवी दिल्ली
प्राप्तीकर रिटर्न भरू पाहणाऱयांसाठी केंद्र सरकारने दिलासा देताना इ-फाईल सादर करण्यासाठीची मुदत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने (सीबीडीटी) याबाबतचा निर्णय घेतला आहे. प्राप्तीकर इ-फायलिंग करतेवेळी सुरूवातीच्या दिवसांमध्ये संकेतस्थळावर अडचणी जाणवल्या होत्या. प्राप्तीकर फॉर्म इ-फायलिंगच्या माध्यमातून भरताना येणाऱया अडचणींचा विचार करूनच केंद्राने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. करदात्यांना आपला 15 सीसी फॉर्म 31 ऑगस्ट 2021 पर्यंत इ-फायलिंग करता येणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.