एचडीएफसीसह रिलायन्सचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील काही दिवस बाजाराचा दबावासोबत घसरणीचा प्रवास सुरु होता. परंतु तो चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी थांबून मोठी तेजी सेन्सेक्स आणि निफ्टीने जागतिक सकारात्मक संकेत आणि देशातील मोठय़ा कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर अनुभवली होती. परंतु पुन्हा तिसऱया दिवशी बुधवारी सेन्सेक्स घसरला तर निफ्टीने आपली तेजी कायम राखल्याचे पहावयास मिळाले आहे.
तिसऱया दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्सचा निर्देशांक प्रारंभीच्या प्रसंगी प्राप्त केलेली तेजी अंतिम क्षणापर्यंत कायम ठेवण्यात सेन्सेक्सला अपयश आले आहे. बीएसईमधील प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्स व्यवहारादरम्यान 452 अंकांनी मजबूत झाला होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 24.58 टक्क्मयांनी घसरुन निर्देशांक 37,663.33 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 11,101.65 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये ज्यांनी मंगळवारी जोरदार कामगिरी केली अशा एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. तेजीच्या प्रवासात असताना गुंतवणूकदारांनी नफा कमाई केल्याच्या कारणामुळे यांचे समभाग एक टक्क्मयांपेक्षा अधिकने घसरलेत. सोबत पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, इन्फोसिस, नेस्ले इंडिया आणि एचसीएल टेक यांचे समभागही नुकसानीत राहिले आहेत.
दुसऱया बाजूला मात्र टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 6 टक्क्मयांनी वधारलेत. तर टायटन, मारुती सुझुकी, भारती एअरटेल आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे स्थान राहिले आहे. दिवसभरात जागतिक बाजाराचा कल आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा प्रवाह कायम राहिल्याने बाजारात चढ उताराचे वातावरण राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. जागतिक बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचा सोल तेजीसह बंद झाले आहेत.