निफ्टी 10,167.45 वर बंद : इंडसइंड बँक तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
मागील आठवडय़ापासून सुरु झालेला शेअर बाजाराचा तेजीचा प्रवास चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारीही कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजारात प्रारंभाची कमावलेली तेजी कायम ठेवण्यात बाजाराला काही प्रमाणात अपयश आल्याचे पहावयास मिळाले असून दिवसअखेर सेन्सेक्स 83.34 अंकांनी वधारुन बंद झाला.
सकाळच्या सत्रात बाजारात समाधानकारक कामगिरी झालेली होती. यात गुंतवणूकदारांच्या नफा कमाईमुळे व्यवहारात सेन्सेक्स 640 अंकांनी तेजीत होता. परंतु नंतर मात्र तेजी हळूहळू ओसरू लागल्याचे पाहायला मिळाले. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 83.34 अंकांनी वधारुन निर्देशांक 34,370.58 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 25.30 अंकांनी वधारून 10,167.45 वर बंद झाला. सेन्सेक्सच्या कामगिरीमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग 7 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. सोबत ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, ओएनजीसी, टायटन, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग वधारले आहेत. व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 3 टक्क्मयांनी वधारलेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजची कर्जमुक्तीकडे वाटचाल आणखीन मजबूत होत असून रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणुकीचा ओघ कायम असल्याचे पहावयास मिळाले आहे. रविवारी जिओमध्ये 1.16 टक्के हिस्सेदारी विकत घेत अबुधाबी इन्वेस्टमेंट ऍथोरिटीने 5,683.50 कोटी रुपयांची गंतवणूक केली आहे. यामुळे रिलायन्सच्या समभागांनी मागील वर्षभरातील उच्चांकी तेजी प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु नफा कमाईमुळे रिलायन्सचे समभाग 0.51 टक्क्मयांनी घसरुन बंद झाले आहेत. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
आशियासोबत अन्य शेअर बाजारात समाधानकारक तेजीसोबत सुरुवात झाली होती. ओपेक आणि अन्य सहयोगी देश कच्चे तेल उत्पादनामधील कपात एक महिना आणखीन वाढविण्यात आल्याने बाजारात सकारात्मक प्रभाव पडल्याचे तज्ञांनी सांगितले असून याचाच काहीसा प्रभाव देशातील शेअर बाजारात नफा कमाई करण्याकडे राहिला आहे.