प्रतिनिधी/ बेळगाव
लग्नसराईतच कोरोना आल्यामुळे प्रिंटींग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे व्यावसायिकांबरोबरच कर्मचाऱयांना फटका बसला आहे. याचबरोबर प्रिंटींग व्यवसायावर अवलंबून असलेल्या संगणक चालकांनाही त्याचा फटका बसला असून प्रिंटींग व्यावसायिकांना सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बेलगाम प्रिंटर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वषी महापुरामुळे आम्हाला फटका बसला होता. त्यानंतर आता कोरोनामुळे यावषी फटका बसला आहे. सलग दोन वर्षे फटका बसल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहे. भाडे, वीज बिल देणे अवघड झाले आहे. याचबरोबर कामगारांनाही पगार देणे कठीण झाले आहे. तेव्हा आम्हाला सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष फारुक गौस काकती, उपाध्यक्ष रेहमतुल्ला शिंदोळकर, सेपेटरी हर्षवर्धन कालकुंद्रीकर, एल. आय. पाटील, पुंडलिक पाटील, सागर हाजगोळकर, परशराम कडेमनी, राजू देसाई, रणजीत लाड यांच्यासह प्रिंटर्स असोसिएशनचे पदाधिकारी व व्यावसायिक उपस्थित होते.