36 व्या वर्षात पदार्पण : महाराष्ट्र ‘मुद्रण श्री’ पुरस्काराने यारबलचा गौरव
बेळगाव : 24 फेब्रुवारी हा मुद्रण तंत्राचा जनक असलेल्या गुटेनबर्ग यांचा जन्मदिन. त्यांनी लावलेल्या शोधाच्या स्मृतिप्रित्यर्थ जगभर ‘मुद्रण दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या मुद्रण क्षेत्रात बेळगावच्या यारबल प्रिंट पॅक प्रा. लि. या कंपनीने घेतलेली गरुडभरारी ही सर्वांनाच अचंबित करणारी आहे.
यारबलने रामलिंग खिंड, बेळगाव येथील रंगुबाई पॅलेसमध्ये मुद्रण व्यवसायासाठी लागणाऱया ब्लॉक मेकिंगपासून कामाची सुरुवात करून नंतर 1986 साली सिंगल कलर ऑफसेट प्रिंटिंगमध्ये पदार्पण केले. या युनिटची उद्यमबागेत सुरुवात केल्यानंतर पुस्तके, डायऱया, कॅलेंडर, स्मरणिका अशी वेगळय़ा प्रकारची अनेक कामे करून यारबलने छपाई व्यवसायात आपले स्वतःचे नाव प्रस्थापित केले. त्यानंतर 2004 साली पॅकेजिंग इंडस्ट्रीजसाठी लागणाऱया चार व त्यानंतर पाच रंगातील छपाईसाठी लागणाऱया अत्याधुनिक मशीनची आयात केली. आज पुणे आणि बेंगळूर यांच्यामधील उत्तर कर्नाटकातील सर्वात पहिली 28ƒ40 आकाराचे पाच कलर पिंटिंग करणारी पहिली ऑफसेट प्रिंटिंग युनिट घालून यशस्वीरित्या चालविण्याचा मान यारबल प्रिंटने मिळविला आहे.
नवनवीन असे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून केले जाणारे मोठे जॉब पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना पुणे, मुंबई अथवा बेंगळूरला जावे लागे. ती अडचण यारबलने दूर केली आहे. प्लास्टिक उत्पादनावर बंदी आल्यानंतर पॅकिंगसाठी पर्याय म्हणून कार्टन इरेक्टिंग मशीनचा शोध लागला. ज्या मशीनमुळे बिर्याणीसाठी लागणारे लिकप्रुफ बॉक्स तयार होतात. मशीन इकोपेंडली असल्यामुळे परिसर संवर्धनाला मदत होते आणि म्हणूनच या कंपनीने पुणे, सातारा, सांगली, बारामती, म्हैसूर, हुबळी, धारवाडबरोबरच मंगळूर, उडुपी, गोव्याचा संपूर्ण भाग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील मोठमोठय़ा व्यवसाय, उद्योजकांचे काम मिळविले. ऑनलाईन फूड डिलिव्हरी सिस्टीमसमोर बॉक्सचा मोठा प्रश्न यारबलने सोडविला. बॉक्समध्ये भरलेले जेवण जसेच्या तसे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फूड इंडस्ट्रीला मोठी मदत झाली आहे.
प्रिंट पॅक क्षेत्रात लागणाऱया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युवी कार्टून प्रिंटिंग करणारी ही कंपनी अजित पाटील आणि त्यांचे चिरंजीव अमेय पाटील सांभाळत असून या कंपनीला प्रति÷sचा नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आला आहे. महाराष्ट्र ‘मुद्रण श्री’ या ख्यातनाम पुरस्काराने यारबलचा गौरव करण्यात आला आहे. पॅकेजिंग इंडस्ट्रीजमधील अनेक राष्ट्रीय पुरस्कारही यारबलने मिळविले आहेत. यारबल या कंपनीचे यश बेळगावकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे. यारबल प्रिंट पॅक या संस्थेने अलीकडेच 36 व्या वर्षात पदार्पण केले आहे. उत्तम दर्जा, सातत्याने नवनवीन करण्याचा ध्यास आणि ग्राहकाभिमुख सेवा ही यारबलची वैशिष्टय़े आहेत, असे अजित पाटील अभिमानाने सांगतात.