अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड कलाकारांचा भरणा असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट ‘मॅट्रिक्स 4’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्याच्या 30 मिनिटातच तो 5 लाख लोकांनी पाहिला होता.
मॅट्रिक्स 4 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कियानू रीव्स, कॅरी-एन्नी मॉस आणि नील पॅट्रिक हॅरिस यांची दृश्ये दिसून येत आहेत. तर ट्रेलरमध्ये प्रियांका केवळ एकदा दिसून आली आहे. ट्रेलरमध्ये अत्यंत धोकादायक ऍक्शनदृश्ये दाखविण्यात आली आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
मॅट्रिक हा या साखळीतील पहिला चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर द मेट्रिक्स रिलोडेड आणि द मेट्रिक्स रिव्हॉल्युशन हे चित्रपट आले होते. तर द मॅट्रिक रिसरेक्शनचे दिग्दर्शन लाना यांनी केले आहे.