ऑनलाईन टीम / वेलिंग्टन :
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी मंत्रीमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांनाही स्थान देण्यात आले आहे.
41 वर्षीय प्रियांका यांनी घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला होता. त्यानंतर मजूर पक्षाच्या वतीने त्या 2017 मध्ये संसदेत निवडून आल्या.
प्रियांका आता सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. 2019 मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती झाली होती.