क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
बीडीएमने आयोजित केलेल्या ‘प्रॅण्डशीप शील्ड 2022’ स्पर्धेत एलिगन्स क्रिकेटर्स, एलिगेटर्स, म्हापसा ड्रिम क्रशर्स आणि गोवन ग्लेडिएटर्स संघाने शानदार विजय नोंदविले. या स्पर्धेतील लीग लढतींचे आयोजन फातोर्डा येथील सराव मैदानावर आणि मळकर्णेतील एसके मैदानावर करण्यात येत आहे.
एलिगन्स क्रिकेटर्सने केपे युनायटेडचा 8 विकेट्सनी, एलिगेटर्सने सडन स्टॉर्म्स क्रिकेट क्लबचा 23 धावानी, म्हापसा ड्रिम क्रशर्सने रायझिंग स्टार्स ऑफ शिरवईचा 95 धावानी तर गोवन ग्लेडिएटर्सने हरीकेन्सचा 40 धावानी पराभव केला.
संक्षिप्त धावफलकः केपे युनायटेड, 16.2 षटकात सर्वबाद 62 (नाभेश फळदेसाई 14, रोहित गावकर 13 धावा. अनीश खांडेपारकर 2 बळी) पराभूत विरूद्ध एलिगन्स क्रिकेटर्स, 9.3 षटकात 2 बाद 67 (फॅलिक्स डायस 18 धावा). सामनावीर- प्रथमेश नाईक (एलिगन्स क्रिकेटर्स).
एलिगेटर्स, 20 षटकात 9 बाद 167 (विराज पुराणीक 97 धावा. रवीश वेर्लेकर 3 बळी) विजयी विरूद्ध सडन स्ट्रॉर्म्स क्रिकेट क्लब, 19.5 षटकात सर्वबाद 144 (सनी नाईक 59, रोहित शिरोडकर 20 धावा. सुकृत पै 3-21). सामनावीर- विराज पुराणीक (एलीगेटर्स).
म्हापसा ड्रिम क्रशर्स, 20 षटकात 7 बाद 170 (पंकज नाईक 59, योगेश कवठणकर 42 धावा. वेद भंडारी व धुव भेंडे प्रत्येकी 2 बळी) विजयी विरूद्ध रायझिंग स्टार्स ऑफ शिरवई, 20 षटकात 7 बाद 75 (आदित्य दलाल 26 धावा. राहुल गोसावी व कौशल च्युरी प्रत्येकी 2 बळी). सामनावीर- कौशल च्युरी (म्हापसा ड्रिम क्रशर्स).
गोवन ग्लेडिएटर्स, 20 षटकात 7 बाद 185 (अंकुश पाटील 37, बाबू केरकर 35, व्यंकटेश नेवगी 35 धावा. विराज लाड 3 बळी) विजयी विरूद्ध हरीकेन्स, 20 षटकात 9 बाद 145 (अथर्व 62 धावा. सनी कामत, अजय पेडणेकर व अभिषेक गोयल प्रत्येकी 2 बळी). सामनावीर- अभिषेक गोयल (गोवन ग्लेडिएटर्स).