वृत्तसंस्था/ पॅरीस
फ्रान्सच्या महिला फुटबॉल क्षेत्रामध्ये बलाढय़ म्हणून समजल्या जाणाऱया लेयॉन महिला फुटबॉल क्लबला 2019-20 च्या प्रेंच फुटबॉल लीग स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले आहे. लेयॉनच्या महिला फुटबॉल क्लबने हे जेतेपद सलग 14 व्यांदा पटकाविले आहे.
फ्रान्सच्या महिला फुटबॉल क्षेत्रामध्ये लेयॉनचा संघ बलाढय़ म्हणून ओळखला जातो. लेयॉनने गेल्या चारवेळा महिलांच्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळविले असून 2007 पासून प्रत्येक वर्षी या संघाने प्रेंच फुटबॉल लीग स्पर्धा जिंकली आहे. कोरोना महामारीमुळे फ्रान्समधील सर्व व्यावसायिक क्रीडाक्षेत्र येत्या सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा फ्रान्सचे पंतप्रधान फिलिपी यांनी केली आहे.