प्रतिनिधी/ बेळगाव
सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या फ्रेंड्स सर्कलच्या सुनीता देशपांडे-बुद्धााळकर या ज्ये÷ सदस्या होत्या. ज्या महिला मंडळाचे सदस्यत्व घेतले त्या मंडळाशी सुनीता देशपांडे-बुद्याळकर यांनी कायम आपले नाते दृढ ठेवले. प्रेंड्स सर्कलमधून त्यांनी अनेक वर्षे केलेले कार्य वाखाणण्याजोगे होते. प्रेंड्स सर्कलला त्यांचा मोठा आधार होता. त्यांच्या निधनाने प्रेंड्स सर्कलने हा आधार गमविला आहे, अशा शब्दात स्वरुपा इनामदार यांनी सुनीता बुद्याळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सुनीताताई अनेक वर्षांपासून प्रेंड्स सर्कलच्या सदस्या होत्या. नुकतेच त्यांचे निधन झाले. सर्कलतर्फे शनिवारी दुपारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आपले मंडळ हा आपला अभिमान आहे, असे सुनीताताई म्हणत. आपल्याबरोबर सुनांनाही त्यांनी मंडळात आणले. वसंत व्याख्यानमालेच्या संस्थापिका मंदाकिनी दप्तरदार यांना त्यांची नेहमीच मदत झाली. दरवषी त्या सभासदांना घरी बोलावून खास कार्यक्रम करत. त्यांच्या अनेक आठवणी मंडळापाशी असून मंडळ नेहमीच त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहील, असेही स्वरुपा इनामदार म्हणाल्या. या सभेत आरती आपटे, जयश्री रेवाळे व बीना तलाठी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या..